Pages

Thursday, May 2, 2013

एक नवीन ‘Trend’: फेसबुक स्टेटस अपडेट्स…


फेसबुक च्या वाढत्या लोकप्रियतेमुळे खूप काही त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टींचा प्रचार देखील वाढत चालला आहे. त्यातली प्रामुख्याने मला दिसलेली बाब म्हणजे ‘Status Updates’. अलीकडे Fathers Day, Brothers Day, अमुक Day तमुक Day या बद्दल आपल्यातल्याच लोकांनी लिहिलेले status updates पाहिले, आणि आता Mother's Day पण येत आहे. त्यामुळे त्या बद्दल पण status updates दिसणार हे माहित आहे. पण इकडचे लोक हे असे Days का एवढ्या उत्साहात साजरे करतात या मागे एक कारण आहे आणि ते म्हणजे, हे आपल्याच आई-बाबा, भाऊ-बहिण यांना सहसा सारखे भेटू शकत नाही किंवा काही कारणास्तव ते आता एकत्र राहत नाहीत. ही त्यांची संस्कृति आहे आणि ते ती पाळतात. आता या बद्दल आपल्या लोकांनी status update करू नये किंवा त्याचा जास्त गाजा-वाजा करू नये कारण आपली ती  संस्कृति नाही, अशा विचारांचा नाही मी पण मग कालच झालेल्या महाराष्ट्र दिन किंवा काही आठवड्यांपूर्वी झालेला पाडवा या बद्दल फारसे status updates दिसले नाहीत. हे असे का? बर, तुम्ही status update करायलाच हवे अशीही काही गरज नाही, पण दिसायला असे दिसते की तुम्ही इकडच्या संस्कृतिबद्दल आपलेपणा दाखवत आहात आणि त्याचबरोबर आपल्या संस्कृतिबद्दल अगदीच दुर्लक्ष्य करत आहात. हे ही तितकेच खरे आहे की प्रत्येकाला त्यांच्या आवडी-निवडी आहेत आणि असतात, व्यक्ती स्वातंत्र्य आहे.  When in Rome, do as the Romans do”. कदाचित मी म्हणतोय ते लोक ह्याच विचारांचे असतील पण मग त्यामध्ये तुमचा सच्चेपणा तरी दिसू द्या. कित्त्येकदा या अशा पोस्ट आणि status updates खोट्या वाटण्यापेक्षा कृत्रिम वाटतात.  

याच status updates संदर्भात अजून एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने बघण्यात आली आहे. हल्ली बरेच लोक आपण स्वतः एखाद्या गोष्टी बद्दल किती जागरूक आहोत हे जगाला दाखवण्याच्या प्रयत्नात दिसतात. नुकत्याच झालेल्या संजय दत्त प्रकरणाबाबतीत ही तेच झाले. संजय दत्त गुन्हेगार आहे नाना पाटेकरने म्हणेपर्यंत आपल्याला स्वत:ला का उमगु नये? आपले स्वतःचे असे काही मत असू नये का? नाना पाटेकर त्याचे सिनेमे पाहत नाही म्हणून मी पण आता पाहणार नाही ही कोणती रीत? म्हणजे नाना काही चुकीचे बोललाय असे मला अजिबात म्हणायचे नाही पण इतरांचे मत त्यावर अवलंबुन का? नानाचे संजय दत्त बद्दलचे विचार हे फक्त एकच उदाहरण झाले. फेसबुकवर रोज उठुन काय वाट्टेल ते पोस्ट करायचे हे फॅड आहे की खरंच त्याबद्दल आपल्याला काहीतरी वाटते म्हणुन केलेला प्रचार आहे अशी शंका येते.

आणि आता एवढे सगळे लिहिल्यामुळे आणि त्यातले काही संस्कृति या विषयला धरून असल्यामुळे, काहीजण अगदी असं ही म्हणतील की तू मोठा राज ठाकरे आहेस सगळ्यांना सुचना द्यायला, आपल्या संस्कृती बद्दल भाष्य करायला. मला नाही माहित अशा विधानांना कसे उत्तर द्यायचे. कसे आहे प्रत्येक वेळी ‘चूक’ आणि ‘बरोबर’, इतकेच मोजमाप नसते, त्याच्या बरोबर प्रकर्षाने बाहेर पडते एक धारणा आणि एक विचार. अगदीच आजच्या भाषेत बोलायचे झाले तर ‘trend’. हा जो काही trend आहे ह्याची मला फार कीव करावीशी वाटते. मला एक प्रकारची भीती ही वाटते कारण हे असे फक्त जगाला दाखवण्याकरता केल्या जाणार्या प्रदर्शनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की हा विचार बरेच दिवस माझ्या डोक्यात होता. आज फक्त मी शब्दातून बाहेर काढला. लोकांनी काय करावे आणि काय नाही हे मी त्यांना सांगणे अगदीच योग्य नाही, पण किमान मला जे दिसत आहे, मला जे खटकत आहे ते मी माझ्या शब्दांत मांडू शकत आहे. मी माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून घेत आहे असेच मी म्हणेन.

7 comments:

Aditya Patil said...

छान लेख.

फेसबुकच्या ३ - ४ वर्षांच्या वापरानंतर मला जाणविलेल्या काही गोष्टी!

१> आयुष्यात गंभीरपणे घ्यायच्या गोष्टीतील फेसबुक ही गोष्ट नव्हे.

२> फेसबूक वापरणारे ८५ - ९० टक्के लोक लक्ष वेधून घेण्यासाठी आसुसलेले असतात.

३> जे लोक आपली संस्कृती, आचारविचार ह्या बाबतीत ठाम विचार मांडून आहेत त्यांच्यावर फेसबुक काही परिणाम करू शकत नाही.

४> आपल्या पोस्ट ला जे लाईक करतात त्यावर प्रतीक्रिया देतात त्यांनासुद्धा प्रतिसाद देणे हा एक फेसबुकच्या दुनियेतील अलिखित नियम आहे.

५> सुरुवातीला सुखांनी नांदणाऱ्या फेसबुकच्या नात्यात आता खऱ्या दुनियेतील रुसव्या फुगव्यांनी प्रवेश केला आहे.

सुधन्वा आगवेकर said...

Thanks Aditya!

SID said...

Wa,

Ya weli Newspaper madhe editorials madhe jas lihitat tashya type madhe wattoy mala post. Flow kamaal, para barobar padlet, mazya mate :P ,.
Thodya weglya style madhe ahe ha blog tuza, pan tuzya normal style madhe lihilele mala jast awdatat, for example "Khadanchya Duniyetali marath moli Sandhyakal", tyamadhe jo descriptiveness ahe na, to jast awadato mala , if you are writing BLOG.
But anyways, Vichar karnyasarkha ahe subject. FB is Second life for most of us. People are living in two worlds, normal World ani FB world.

P.S- Mala marathi font madhe nahi lihita yet, Mafi asavi.

सुधन्वा आगवेकर said...

Thanks Patya.
Baghu aata tu mhantoes tar punha ekda tya paddhatine lihaycha praytna karto.

Nikhil said...

Shewati koni kiti hi kahihi mhatla tari sagale jana roj aapla FB stream check kartat. Barich loka mhantat mi kadhi FB war like kinva post karat nahi, kinva mala te aavadat hi nahi. Pan ashich loka jast wel tikade itar loka kay karat ahet he baghat astat. Sagalach wirodhabhas ahe.

Pan shewati ek goshta matra nakki ahe - "आयुष्यात गंभीरपणे घ्यायच्या गोष्टीतील फेसबुक ही गोष्ट नव्हे."

Unknown said...

मला असं नाही वाटत की सुधन्वा facebook वापरण्याबद्दल बोलत आहे. म्हणजे वरील comments वाचून मला असंच वाटत आहे की ह्या blog चा अर्थ तसा घेतला जात अहे. Facebook किती आणि कोण वापरतो हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे आणि निखिल म्हणाला त्याप्रमाणे ते सगळेच वापरत असतात. सुधन्वाचा मुद्दा असा आहे की ते facebook वापरात असताना लोक त्यावर काय post करतात आणि त्यातल्या किती गोष्टी त्यांना पटलेल्या असतात किंवा किती त्याचं स्वतःचं मत म्हणून मांडल्या गेलेल्या असतात हे शंकास्पद आहे आणि तसा अर्थ असेल तर मी सहमत आहे.
correct me if i am wrong

सुधन्वा आगवेकर said...

exactly!
हर्षद ने जे लिहिलंय तेच मला म्हणायचे आहे.