Pages

Saturday, September 18, 2010

पहिला पाउस!


सकाळी bus stop वर ती उभी होती आणि रस्त्याच्या पलीकडून मी तिच्याकडे बघत होतो. सकाळ पासूनच पावसाने थाट मांडला होता आणि इकडे माझ्या raincoat ने मला दगा दिला होता. पावसाने चिंब भिजलेला मी तसाच तिथे तिष्ठत तिच्याकडे बघत उभा होतो आणि आशा करत होतो की तिने नुसतं माझ्याकडे एकदा पहावे. जोरदार वाहणारा वारा, तो मुसळधार पाऊस, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, त्यांचे आवाज, तो उडणारा चिखल, सगळे माझं लक्ष्य विचलित करण्याच्या प्रयत्नात होते पण मी, मी मात्र त्या सगळ्यांवर मात करून तिच्याकडे बघत होतो. तिने माझ्याकडे पाहिले, पण...पाहून नापाहिल्या सारखे केले. मी तिथेच तसाच उभा होतो. मधूनच तिची नजर माझ्याकडे पडायची पण माझ्या डोळ्यांनी काही बोल्याच्याआतच ती नजर फिरवायची.

मी म्हणालो आता तरी बोल....

Bus समोर येऊन उभी होती आणि ती बस मध्ये चढली देखील होती. मी तिच्या खिडकी पाशी गेलो आणि तिला हाक मारली. एकदा मारली, दुसऱ्यांदाही मारली, bus मधील सगळ्या लोकांनी पाहिले पण तिने पाहिलं नाही.
मी म्हणालो आता तरी बोल....

Bus निघून गेली. मी तिला फोन केला पण तिने तो cut केला. मी पुन्हा एकदा प्रयत्न केला पण निकाल तोच फरक इतकाच, आता तिचा फोन वाजत राहिला. मी dialer tone बंद होई पर्यंत कानाला लाऊन ठेवला होता. मी म्हणालो आता तरी बोल पण शेवटी तो tone ही बंद झाला होता.
मागे वळलो आणि गाडी काढली आणि त्या traffic मध्ये माझीही भर पडली. चिखल, धूर सगळ्यांच्या मिश्रणातून माखलेला मी गाडी चालवत होतो. चालवत कसली रेटत होतो. Traffic मुळे वैतागलो होतो. त्यात रस्त्यातल्या खड्ड्यांनी आणि cycle वाल्यांनी अजून मनस्ताप दिला. तेवढ्यात एक गाडी शेजारून जोरात सगळे चीखलेचे पाणी उडवत गेली. माझा चेहरा, माझा पांढरा शर्ट सगळा चिखलमय झाला. आता मात्र राग, मनस्ताप, वैताग सगळं अगदी विकोपाला पोहोचलं होत्. शेजारच्या scooter वर बसलेली एक लहान मुलगी माझ्याकडे बघून अगदी दिल खुलास हसली. तिच्याही अंगावर ते चीखलेचे पाणी उडालेलं पण ते तिला आवडले होते. ती सारखा तिच्या डोक्यावरून रेनकोट काढत होती आणि तिची आई तो परत तिच्या डोक्य्वर घालत होती. ते पुढे निघून गेले. रस्त्याच्या पलीकडे साठलेल्या पाण्यात दोन-चार लहान मुलं मनसोप्त उद्या मारत होती आणि इकडे माझ्या चेहऱ्यावर वैतागाच्या आठ्यानी गर्दी केली होती.

मी कुठे जात होतो मला काही कळत नव्हते. ज्यावेळी लक्षात आले तोपर्यंत मी अगदी नदीवरचा पूल cross करून पुढे गेलो होतो. मी जरा भानावर यायचा प्रयत्न केला आणि गाडी परत मागे वळवली. तेवढ्यात मी एका माणसाला धडकलो. चूक माझीच होती म्हणून मी त्याला sorry म्हणणार तितक्यात तोच मला म्हणाला “माफ करा हां साहेब” आणि तो cross करून निघून गेला. त्याची बायकोही होती त्याच्या बरोबर. तिने cross करता करता त्याला विचारलं “लागलं नाय ना हो?”, त्याने नकारार्थी ,मान हलवली आणि ते पुढे चालत गेले. मी त्यांच्याकडे का कुणासठाऊक पाहताच होतो. दोघेही कदाचित मजूर होते, दोघांच्याही अंगावर ते भले मोठे निळे प्लास्टिक ओढले होते. चालत असताना त्याने तिच्या डोक्यावरचे प्लास्टिक व्यवस्थित adjust केले आणि ते दोघे पुढे निघून गेले. मी त्यांच्याकडे निर्विकारपणे बघत होतो. तेवढ्यात मागून गाडीवर एक मुलगी येऊन म्हणाली “हेलो ...रस्त्याच्या कडेला जा आणि मग हवा तितका विचार करा”. मी तिच्याकडे पहिले आणि ती हसत निघून गेली.

इकडे पावसाचा जोर वाढत चालला होता. गाडी चालवता चालवता गेल्या दोन-चार दिवसात मी असं काय केले होते ह्याचा विचार करत होतो. आज मी गाडी कमी चालवत होतो आणि विचार जास्त करत होतो. Crossing पाशी थांबलो, रस्त्यावरून रंगे-बिरंगी रेनकोट घातलेल्या शाळेतल्या मुलांचा ताफा जात होता. निर्-निराळ्या रंगांचे प्रदर्शन भरल्यासारखे ते दिसत होते. त्यातच दोन रेनकोट जरा उठून दिसत होते. दोन्ही एकसारखेच होते, भडक गुलाबी रंगाचे आणि त्यावर निळ्या रंगांची फुले होती. मी बारकाईने बघण्याचा प्रयत्न केला. रेनकोट च्या आत सोन छोटे चेहरे मला दिसले, एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांनी एकमेकांचे हात अगदी घट्ट ठरून ठेवले होते आणि त्या crossing वर मस्त रुबाबदार पणे चालत होते.

आज मला असचं का सगळं दिसत आहे? एवढा वैताग असूनही मन इतकं आनंदीही आहे आणि काहीतरी खुणवत पण आहे. गाडी सुरु केली आणि निघालो. मनातला विचार काही केल्या जाईना. एकदा परत तिला फोन करावासा वाटला पण आता माझा ego माझ्या आड आला. म्हटलं जाउदे, आता केला तर तीच करेल. असं म्हणे पर्यंत माझ्या शेजारून एक scooty गेली. एक क्षण मी त्या scooty वरून जाणाऱ्या मुली कडेच बघत होतो. ती मुलगी त्या पावसात बेधुंद होऊन गेली आहे. मागे बसलेले तिचे वडील सारखं तिला डोक्यावरून ओढणी घ्यायला लावत आहेत पण ती मुलगी तिच्याच विश्वात आहे. पावसामुळे, वाऱ्यामुळे ती ओढणी तिच्या डोक्यावरून घसरत आह, पण तिला ते कळत नाहीये. तिच्या लक्षातही येत नाहीये. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो पाऊस सुद्धा हुरळून जाईल, असं ते दृश्य होत्.

आता मात्र कहर होत् होता. हे असं सगळं मलाच का दिसत आहे? मला ते आता बघवत नव्हते. माझी ही अशी अवस्था, त्यातून बाहेर सगळे मनसोप्त बागडत आहेत. हे म्हणजे एखाद्याला मुद्दाम चिडवण्या सारखे होते. मी ठरवले, आता बास! कुठेही नबघता सरळ घराकडे गाडी वळवायची.

फोन वाजला....उत्कंठा वाध्लीवाध्ली...पण आईचा फोन होता. मी cut केला आणि निघत आहे तोपर्यंत कुठून तरी चहाचा मस्त वास आला. मी थांबलो. समोर एका झाडा खाली चाह्ची टपरी होती.गाडी लावतो तितक्यात “काय चाललाय तुझं?ती सिगारेट फेक हं” असं माझ्या कानावर आले. आवाजाच्या दिशेने मी पहिले. एक मुलगा आणि त्याची मैत्रीण असे दोघे त्या टपरी समोर उभे होते. मुलगा थंडी मुळे कुडकुडत होता. त्याच्या एका हातात छत्री होती आणि दुसऱ्या हातात सिगारेट. त्या मुलीच्या हातात गरम चहा, जो तिने रुमालात पकडला होता आणि त्याला तो पिण्याकरता ती अतोनात कष्ट करत होती. सिगारेट आणि चहाच्या वासात आता त्या ओल्या मातीचा सुगंध सुद्धा मिसळला होता. मला ते बघून अगदी तृप्त झाल्या सारखे वाटले...पण मनात काहीतरी खुणावत आहे. त्या दोघांकडून माझी काही नजर काही हलेना. माझा फोन वाजला, परत उत्कंठा वाढली, आता मात्र विकोपाला पोहोचली होती....कदाचित तिचा असेल...पण पाहिले तर आईचा होता. Cut केला आणि निघणार तेवढ्यात “अरे ये रे, काही नाही होत्” असं त्याच मुलीने म्हटलेले मला ऐकू आले. कुडकुडत असलेल्या त्या मुलाला ती मुलगी बाहेर पावसात बोलवत आहे, पण तो काही यायला तयार नाहीये. “ अरे ये रे...पहिला पाऊस आहे....पहिल्या पावसाचा आनंद काही वेगळाच असतो रे....परत परत हे असं अनुभवायला मिळणार नाहीय....ये रे लवकर” असं म्हणत त्या मुलीने त्याला ओढत पावसात भिजवलं. एखाद्या सिनेमात एखादा romantic scene आणि तोही slow motion मध्ये कसं दिसेल असं ते सगळे दिसत होतं. त्या मुलीने त्याचे हात ओढत त्याला टपरीच्या छपरा खालून बाहेर काढले आणि त्याच्या हातातली छत्री उडवून लावली आहे. ती छत्री अशी slow motion मध्ये खाली साठलेल्या पाण्यात पडली आहे. पडल्यावर त्या पाण्याचे काही थेंब हवेत उडून परत पाण्यात पडले आहेत. मागे background ला झाडावर आदळणारा तो पावसाचा आवाज आणि आता ते दोघे पावसात चिंब भिजून गेले आहेत.

इथे मला लक्षात आले की काल रात्री पासून पडत असलेला हा पाऊस या वर्षीचा पहिला पाऊस आहे. मला आता काही सुचेना. त्या दोघांना पाहून तिची आठवण आली. या क्षणी जर ती असती तर.....
मगाचपासून दिसणारी ही वेगवेगळी दृश्य आणि मला ते सगळं पाहिल्यानंतर आतून वाटणारी भावना नेमकी काय होती हे आत्ता मला कळत होत्. तो आनंद आणि ते खुणवत असलेले माझे मन नक्की काय होतं हे मला उमगले. हा पाऊस हळू हळू टप्प्या टप्प्यात सगळं काही सांगून गेला होता. पण मग मला जे वाटतं आहे ते तिलाही वाटत असेल का?

त्याच क्षणी मी फोन काढला आणि तिला फोन लावला. फोन engage होता. परत लावला पण पुन्हा engage. मला कळेना की एवढं काय झालं आहे. तेवढ्यात मला माझ्याच फोन वर missed call दिसला. तो मात्र तिचाच होतं आणि आत्ताचआला होता.तिला परत फोन लावणार तितक्यात sms आला. Sms तिचाच होता. “या पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद काही निराळाच असतो हे माहित होत् मला....पण बरोबर आवडणारी व्यक्ती असेल तर अजून छान आणि निराळा होऊन जातो. वाग्ले. इतकं चिडायला नको होत् मी. सकाळी वागले त्या बद्दल sorry. संध्याकाळी भेटू....hope so पाऊस पडतच राहील आणि आपण या आपल्या दोघांच्या पहिल्या पावसाचा मनसोप्त आनंद घेऊ...bye TC”