Pages

Thursday, October 14, 2010

प्रिय पालक मंडळी....



‘पालक’.....पालक या शब्दाचा( खायचा पालक नव्हे!) उल्लेख झाला की मला माझी शाळाच आठवते. ह्याचं कारण असं आहे की, शाळेत कधीही वेडे-वाकडे वागलं, थोडी मस्ती केली, गृहपाठ केला नाही म्हणजे एकूणच काय आपण असं काही केलं जे आपल्या बाई-मास्तरांना आवडत नाही(आणि नेमकं तेच आपल्याला आवडते) आणि त्यांना हवं तसं आपण वागलो नाही की लगेच “उद्या पालकांना घेऊन यायचं बर का!”. त्यातून ही पालक मंडळी म्हटलं की त्यांचे एक-एक copyright dialogues देखील आठवतात. त्या dialogues चा भडीमार इतक्या वेळा होत् असे की dialogue सुरु झाला की दुसऱ्या सेकंदात आपणच तो dialogue पूर्ण करून टाकायचो(मनातल्या मनात).


पालकांचा आवडता शब्द किंवा सगळ्यात आवडणारी कृती कुठली तर ‘अभ्यास’.

“अरे अभ्यास कर, असा वेळ घालवू नकोस....आत्ता अभ्यास नाही केलास तर पुढे सगळा अंधार आहे”
त्यातून पुढचं म्हणजे...
“अभ्यास करायचा ठरवलं की कधीही, कसाही आणि कुठेही करता येतो. तुम्हांला सगळं हाताशी मिळत आहे ना, म्हणून तुम्ही हे असे दिवे लावताय....आमच्या काळी मुलं बेहर विजेच्या खांबाच्या खाली, रात्र-रात्र जागून अभ्यास करायचे.”

मला अगदी शंभर टक्के खात्री आहे की ही अशी वाक्य प्रत्येकाने किमान शंभरदा ऐकली असतील(आणि जर ऐकली नसतील तर आपल्यात काहीतरी fault आहे असं समजावं). त्यातून ही वाक्य ऐकायला येताच कुठेतरी लांब पळून जावसं वाटणे किंवा त्याच क्षणी कोणी तरी येऊन कानात earphones घालावे आणि जोरात rock music लावाव अस् वाटणे ह्यात काही दुमत नाही(नाही वाटले तर तुमच्यात खरंच काहीतरी fault आहे). निष्कर्ष काढायचा झाला तर असा काढता येईल की, शाळेपासून ते अगदी degree मिळेपर्यंत ‘अभ्यास’ हा एखाद्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे जो त्याने सतत जोपासला पाहिजे.

“तुम्ही शाळेत जाता ना? मग अभ्यास हा केलाच पाहिजे, पहिला नंबर आलाच पाहिजे”
अहो पण प्रत्येकाचा पहिला नंबर कसा येईल? या प्रश्नाचं देखील काही विद्वान आणि हुशार पालक हो न-यायला काय झालं आहे?...नीट अभ्यास केला की वाट्टेल ते होऊ शकते” असं उत्तर द्यायचे.

“तुझ्या वयाला हे असं बोलणं, असं वागणं अजिबात शोभत नाही” किंबहुना “माणसाने ज्या-त्या वयात त्या-त्या गोष्टी कराव्या” म्हणजे एकूणच तात्पर्य काय की काही गोष्टी, काही कृती या विशिष्ठ वयात करण्याकरता तयार केल्या गेल्या असतात. आणि हो, हा सर्व मान्य विचार, तत्वाद्यान(जे काही म्हणा!) आहे. “अहो पण काही गोष्टी त्या वयाकरताच असतात” असं चुकून जरी आपण म्हंटले की एक फटका बसलाच समजायचे. एवढच नव्हे पुढे पूर्ण रामायण ऐकायला लागतं. “अहो मुलं शाळेत आहेत, दंगा-मस्ती, खोड्या त्या-त्या वयात नाही केल्या तर काय म्हातारपणी करणार?”(असं मनातल्या मनातच म्हणायचं, नाहीतर चोप मिळतो)

अजून एक patent dialogue म्हणजे...
“हल्लीच्या मुलांना ना पैशाचं महत्वाचं नाहीये...मागितले की सगळं मिळत आहे ना, त्यामुळे ते जास्त शेफारले आहेत.” असं म्हटलं की झालं. आपण त्यांना समजवायचा प्रयत्न केला की “जास्त अगव्पणा करू नकोस, तुझ्या पेक्षा चार पावसाळे जास्त पहिले आहेत आम्ही”. म्हणजेच काय आपण काहीही बोललो, किंवा नाहीच, आपण काही बोलूच शकत नाही.

पालक अगदी टोकाची भूमिका घेण्यात पण पटाईत असतात, आणि खास करून आपल्या आया.
आज सहजंच मी एका ठिकाणी थांबलो होतो, तेंव्हा मला दोन-चार बायकांचं बोलणं ऐकू आलं(जेंव्हा बायका बोलत असतात तेंव्हा कान लाऊन ऐकावे, धमाल असते). “आमचा रोहन असा नाही हां! त्याचं time-table अगदी ठरलेलं असतं, आणि अभ्यास म्हटलं की अभ्यास. तो निखिलच मुळी जास्त आगाऊ आहे. स्वतः अभ्यास नाही करायचा आणि ह्यालाही नाही करून द्यायचा.” हे जर त्या रोहन ने ऐकलं ना तर तो बेशुद्ध होऊन पडायचा.
मला त्या बायका कोण होत्या किंवा तो रोहन कोण आहे  हे माहित नाही, पण अनुभवावरून सांगतो की, वास्तविक तो रोहनच असणार ज्याचं काही time-table नाहीये कारण time-table हे निखिलचंच असणार आणि तोच अभ्यासू असणार आणि रोहन जास्त आगाऊ असणार.

हे पालक लोकं असे का असतात हा प्रश्न माझ्या सारख्या अनेकांना पडत असेल कारण हा प्रश्न पडणे खूप स्वाभाविक आहे. पण खूप विचार करून मी एका निष्कर्षाला पोहोचलो आहे की, हा प्रश्नच चुकीचा आहे....पालक मंडळी ही अशीच असतात.