चला.......नेमकं ज्यासाठी मी इथे आलो होतो ती वेळ आता जवळ आली आहे ह्या भावनेनेच मी अतोनात खुश झालो होतो. एकीकडे आमची आई आणि आमचे वडील, वधु-वरांना शुभेच्छा देण्याकरता लागलेल्या रांगेत तंबू ठोकून उभे होते आणि इकडे मी या buffet table वर ठेवलेल्या सुंदर-सुंदर महाराष्ट्रीय पदार्थांच्या गर्दीत अगदी हरवून गेलो होतो. कोपऱ्यातल्या आम्रखंडा पासून सुरु करू का नियमाप्रमाणे मसाले-भातापासून सुरु करू हाच प्रश्न मला बराच वेळ पेचात पाडत होता. एकदा वाटले की सरळ दोन वडे आणि तळण ताटात घ्यावं आणि समोरून कोकम सरबत आणून आरामात एका-एका घोटा बरोबर ते चकण्या सारखं खावं. पण म्हटलं नको. माझी नैतिकता थोडी आड आली. तेवढ्यात आईच्या आवाज ऐकला. कोणा एका बाईशी ती बोलत होती. त्या बाई बरोबर एक पंजाबी ड्रेस घातलेली मुलगी उभी होती. “अगबाई ही का नमिता” असं आईने म्हटलेले मी ऐकले. नमिता.....नमिता हे नाव मी ऐकले आणि नमिता नावाला शोभतील असे असंख्य चेहरे माझ्या डोळ्यासमोर आले. लगेच मागे वळून पाहिलं. पण ती नमिता का कोण पाठ करून उभी असल्यामुळे तिचा चेहरा मला दिसत नव्हता. मी परत माझी नजर समोरच्या buffet table वर फिरवली. “आरे वाह! केवढी मोठी झाली आहेस तू नमिता” आमची आई. मला आजतागायत कळले नाहीये की हा प्रश्न या आया किंवा तत्सम बायका का विचारतात. नाही, म्हणजे “केवढी मोठी झाली आहेस” याचं नेमकं उत्तर द्यायचं तरी काय? आता बऱ्याच वर्षांनी एखादी व्यक्ती भेटली की ती मोठी झाली असणारच, त्यात या आयांना इतकं आश्चर्य वाटण्यासारखे काय असते हे त्यांनाच ठाऊक.
जाउदे....आता मात्र माझी भूक (खरं तर हवरेपणा) अगदी विकोपाला पोचली होती आणि याला माझ्या पोटातून येणारा गुर-गुरणारा आवाजही साक्ष होता. मी मागे वळून “आई” अशी हाक मारली. तिकडे आई “आरे हो...हा बघा माझा मुलगा ” असं म्हणाली आणि त्या दोन बायांनी मागे वळून पाहिलं. “आईला पण ना नेमकं आत्ताच introduce करायचं होता का? आता अजून १०-१५ मिनिट थांबावे लागणार” या अशा आविर्भावात मी आईकडे आणि त्या बायांकडे पहिले. पण ते भाव आणि माझी ती मुद्रा इतक्या लगेच बदलेल याचा मी विचारही केला नव्हता. तो क्षण मी माझ्या अख्ख्या आयुष्यात विसरू शकेन असं मला वाटत नाही. त्या नामिताने मागे वळून पाहिलं आणि इकडे मी अगदी पुणेरी भाषेत म्हणायचं झालं तर “गार पडलो”.
जाउदे....आता मात्र माझी भूक (खरं तर हवरेपणा) अगदी विकोपाला पोचली होती आणि याला माझ्या पोटातून येणारा गुर-गुरणारा आवाजही साक्ष होता. मी मागे वळून “आई” अशी हाक मारली. तिकडे आई “आरे हो...हा बघा माझा मुलगा ” असं म्हणाली आणि त्या दोन बायांनी मागे वळून पाहिलं. “आईला पण ना नेमकं आत्ताच introduce करायचं होता का? आता अजून १०-१५ मिनिट थांबावे लागणार” या अशा आविर्भावात मी आईकडे आणि त्या बायांकडे पहिले. पण ते भाव आणि माझी ती मुद्रा इतक्या लगेच बदलेल याचा मी विचारही केला नव्हता. तो क्षण मी माझ्या अख्ख्या आयुष्यात विसरू शकेन असं मला वाटत नाही. त्या नामिताने मागे वळून पाहिलं आणि इकडे मी अगदी पुणेरी भाषेत म्हणायचं झालं तर “गार पडलो”.
एखाद्या मासिकाच्या दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर असलेल्या सुंदर मुली सारखी ती होती. कदाचित ‘सुंदर’ हा शब्द सुद्धा तिला पूर्ण पणे न्याय देऊ शकणार नाही. काळे-भोर डोळे, लांब सडक केस, मोरपंखी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि त्यालाच match होणारी तिची अगदी बारीकशी टिकली. उजव्या हातात साधारण त्याच रंगाची जाडसर बांगडी. फिकट गुलाबी रंगाची Lipstick तिने लावली होती. ती दिसायला खूप गोरीही नव्हती पण तशी सावळीही म्हणता येणार नाही. साधारण पंचविशीतली असावी, पण तिच्या चेहऱ्यावर एक निरागस भाव होता. तिच्या मानेवर डावीकडच्या बाजूला एक तीळ दिसत होता. मी मनातल्या मनात त्या ब्रम्ह देवाला वंदन केले आणि त्याचे आभार मानले. याच क्षणी मला पु.लंच्या हरितात्या मधली “यमी पेक्षा सहापट गोरी” असलेली ती कल्याणच्या राजाची सून देखील डोळ्यासमोर आली. अर्थात ही नमिता यमी पेक्षा सहापट गोरी या category मधली नव्हती. पण तेंव्हा शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या राजाच्या सुनेचे आणि तिच्या सुंदरतेचे ज्या प्रकारे कौतुक केले होते त्याच प्रकारे मी आता या नामितेचे करत होतो, अर्थात मनातल्या मनात. इथे मी ब्रम्ह देवाबरोबर त्या भवानी मातेचेही आभार मानले (एकदम भवानी माता का? असा ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनी पु.लंच ‘हरितात्या’ एकदा जरूर ऐकावे). तेवढ्यात आमच्या आईने एक अत्यंत विधायक कार्य केले “ऐक रे, नमिता आणि तू जेऊन घ्या...आम्ही येतोच...चालेल ना तुला नमिता?”. “हो हो चालेल ना” असं नमिता म्हणाली आणि इकडे माझ्या मनात violin वाजायला लागले. पहिल्यांदा तिचा आवाज ऐकला. परमेश्वर एखाद्याला एवढे सुंदर कसे काय करू शकतो? मी शून्यात जायच्या आधीच नमिता म्हणाली “चल, जायचं ना आपण?”. असं काही विचारल्यावर कोणी नाही म्हणेल का? आणि मी तर नाहीच नाही. आम्ही दोघेही त्या buffet table पाशी गेलो.
पुढचा प्रवास बऱ्यापैकी शांत होता. कारण असं होतं की जेवताना ती पूर्ण शांत होती, एक शब्दही ती बोलली नाही. मी, ती काहीतरी बोलेल या अपेक्षेने तिच्याकडे बऱ्याच वेळा चोरून बघतही होतो आणि हो माझी ती जेवायची इच्छा किंवा भूक आधी सारखी राहिलीच नव्हती. तेवढ्यात “मठ्यात साखर जरा जास्तच झाली आहे ना?” अचानक समोर येऊन उभी राहिलेली तिची आई माझ्याकडे बघून म्हणाली. कदाचित तिच्या आईला मी नमिता कडे चोरून बघत आहे हे कळले होते. मी आपलं उगाच काहीतरी बोलायचचे म्हणून “हो हो थोडी जास्तच झाली साखर” असं बोलून गेलो आणि उगाच हसतात ना तसं हसलो. आमच्या मातोश्रींनी नको असलेला dialogue मारला. “आरे पण तू मठ्ठा घेतला आहेस कुठे?” असं भोचकपणे म्हणून आमच्या आईने माझी अगदी बोबडी वळवली. मग मी सावरा सावर करत “अग मगाशी मी तिकडे...म्हणजे त्या buffet table वर थोडीशी चव घेतली होती..तशी साखर जास्तच आहे” असं काहीतरी म्हणालो आणि तेवढ्यात ही नमिता हसली. म्हणजेच काय मी काहीही न करता माती खाल्ली होती. आमच्या आईने मगाशी केलेल्या विधायक कार्याची फिट्टमफाट झाली. आमच्या आया आम्हाला(कदाचित मलाच) त्या अवघड situation मध्ये ठेवून निघून गेल्या.
इकडे नमिता अजूनही माझ्या कडे बघून हसतच होती. मला आता खुपच awkward वाटत होत्. पण तेवढ्यात ती म्हणाली “तुम्हा मुलांना ना, अशा situation व्यवस्थित पणे सांभाळता येतच नाहीत, सगळी मुलं इथून-तिथून सारखीच”. मी पेचात पडलो आणि तिच्याकडे त्याच प्रश्नार्थक चेहऱ्याने बघितले. नमिता हसतच म्हणाली “आता निदान माझ्या समोर तरी असा आव आणू नकोस, तू माझ्या कडे चोरून बघत होतास हे आईला कळले होते म्हणून तिने तुला तसं विचारलं”. मी मनातल्या मनात “अरे बापरे..असं होत् होय!”. नमिता “मला सांग, तुला खरंच माहित नाहीये का तुला माहित आहे आणि तू आव आणत आहेस?” मी “म्हणजे?”. ती “म्हणजे आपल्या दोघांना त्यांनी एकटे का सोडले? तुला ह्या लग्नात तुझ्या आईने का आणले हे तुला अजूनही कळले नाहीये? वा!...मला आधी अंदाज होताच पण मग मगाशी तुझी आई भेटल्यावर तिने ज्या पद्धतीने बोलणं सुरु केलं, माझी खात्री पटली...sorry पण एक सांगते, तुझ्या आईले खोटं बोलायला अगदीच जमत नाही...असो...” मी विचारात पडलो. आईने मला लग्नात येणारेस का विचारल्यावर मी स्वतःहून होकार दिला होता, कारण मला लग्नातले जेवण जेवायचे होते. पण असं काही तिचा उद्देश असेल याचा काही अंदाजच नव्हता. नमिता अजूनही माझ्याकडे बघत होती. मी “नाही, मला असं काही असेल असं खरंच माहित नव्हतं...infact आत्ता तू सांगितलास म्हणून माझ्या डोक्यात tube पेटली...आमची आई म्हणजे...solid आहे की...इतकी हुशार असेल असं वाटलं नव्हतं मला”. ती हसली आणि पुन्हा एकदा मी तिच्या कडे बघत बसलो. नमिता “अरे परत तेच...नुसता बघणार आहेस की पुढे काही बोलणार आहेस? त्या क्षणी मला काय बोलायचे ते सुचेनाच कारण तिने एकदम मुद्द्यालाच हाथ घातला होता. “असा शून्यात काय बघत आहेस? हे बघ मला तुझ्या बद्दल सगळी माहिती आहे...गेला आठवडा आमच्या घरात फक्तं तुझचं गुण-गान चालू आहे....तू कुठे असतोस..कुठे काम करतोस, पगार किती, दर weekend ला मित्रांबरोबर दारू पितोस” मी तिचे वाक्य तोडत “दर weekend ला? हे कोणी सांगितलं तुला...कोणी का सांगेना पण हे खोटं आहे..दर weekend ला वगेरे काही नाही.....कधी तरी मित्र जमले की थोडी घेतो....हे मात्र...” असं म्हणेच तोपर्यंत ती पुन्हा हसायला लागली आणि तसच हसता हसता म्हणाली “म्हणजे तू दारू पितोस! Anyways मला काही problem नाहीये पण फक्त तुझ्या तोंडातून ऐकायचे होते” शब्दात पकडून तिने shockच दिल्यासारखं होत् हे. मी चाट पडलो. मुलींनाच हे कसं जमतं हा प्रश्न परत एकदा माझ्या मनात येऊन गेला. आता मात्र ती माझ्याशी दिल खुलास पणे बोलत होती आणि मला ते आवडलं. पहिल्याच भेटीत तिने मला नुसत्या सौंदर्याने नाहीतर तिच्या एकंदर smartness ने impress केले होते. “तु इथे का आला आहेस हे तुला माहित नव्हते म्हणजे माझ्या बद्दलही तुला काहीच माहित नसणार...नाही सहाजिकच आहे” असा तिने टोमणा कम प्रश्न विचारला. मी अर्थातच नकारार्थी मान हलवली आणि मग तिने मला तिच्या बद्दल सगळं सांगितलं. खरंतर तिच्या बोलण्याकडे माझं लक्ष नव्हतं. मी, ती ते ज्या उत्साहाने आणि प्रामाणिकपणे सांगत होती, ते बघत होतो. मी तिचे बोलणे थांबून तिला अगदी सरळ सोट प्रश्न विचारायचे ठरवले. “ते सगळं ठीक आहे..तू एवढं बोलत आहेस...आणि मगाशी जेवताना अगदी शांत, सोज्वळपणे नबोलता जे काही आव आणलास ते आता कुठे गेले? पण ते ही सोड, माझ्या बद्दल तुला सगळं माहित आहे...तुझ्या आईलाही माहित असणार...पण मग पुढे काय? तुझं उत्तर काय आहे?” असं विचारून मी तिच्या चेहऱ्याकडे बघत बसलो. आता ती ही चाट पडली होती. नमिता “उत्तर म्हणजे...एकदम असं direct तोंडावर कसं सांगू?” मी “का? त्याला काय झालं? मी माझं उत्तर fix केले आहे!” नमिता “काय आहे तुझे उत्तर?” “म्हणजे, मी उत्तर दिल्यावर तू ठरवणार का? हे बरे जमते तुम्हाला....तु अजून काही ठरवले नसले तर ठीक आहे...take your time…मी माझं उत्तर माझ्या आईला सांगतो...मग ते काय करायचे ते करतील..ok?” असं मी म्हणालो आणि आई कडे गेलो आणि मला सगळं कळलं आहे असं तिला सांगितलं आणि नमिता पसंत आहे असंही सांगितलं. तिकडे नमिता आमच्याकडे लांबून पारख ठेवून होती. शेवटी मी तिकडून बाहेर पडायच्या आधी नमिता कडे एक नजर टाकली. ती ही माझ्याकडे बघत होती..आता ती थोडी सावध झाली होती आणि एका प्रश्नार्थक चेहऱ्याने ती माझ्याकडे बघत होती. मी तिच्या कडे बघून हसलो आणि ह्या हसण्याचा अर्थ तिला ही कळला होता.
पुढे काही दिवसांनी, त्या वर्षीच्या दिवाळीच्या आधी हा दिवाळी अंक आमच्या घरात येऊन आमच्यातला झालेला होता.